Published On : Fri, Aug 7th, 2020

प्रेमसंबंधाच्या वादातून पत्नीने प्रियकराच्या संगनमताने केली पतीची हत्या

मृतक पती आरोग्य विभागात परिचारक पदी होता कार्यरत

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भीमनगर मार्गावरील कामठी नगर परिषद पाण्याच्या टाकिसमोर शारदा नामक महिलेच्या घरी भाड्याने राहत असलेल्या व आरोग्य विभागात परिचारक पदी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खुद्द त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीचे हात बांधून त्याच्या तोंडाला उशीने दाबून जीव घेतल्याची घटना मध्यरात्री 2 दरम्यान घडली असून मृतक पतीचे नाव राजू हरिदास कुकुर्डे वय 37 वर्षे रा.हल्ली मुक्काम भीमनगर रोड कामठी असे आहे.तर आरोपी पत्नी चे नाव शुभांगी राजू कुकुर्डे वय 30 वर्षे , (प्रियकर)रुपेश दिलीप बीरहा वय 35 वर्षे ,रा उपजिल्हा रुग्णालय वसाहत कामठी, (प्रियकराचा चुलत भाऊ) हरीचंद्र राजेंद्र बीरहा वय 34 वर्षे रा बोरियापुरा कामठी असे आहे.पोलिसांनी वेळीच तिन्ही आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध भादवी कलम 302, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक राजू कुकुर्डे हा पत्नी शुभांगी व 5 वर्षीय मुलासह सुखी जीवन व्यतीत करूंन कामठी च्या शासकोय उपजिल्हा रुग्णालयात परिचारक पदी कार्यरत राहून शासकीय उपजिल्हा रुग्णालय च्या वसाहतीत वास्तव्यास होता तर आरोपी रुपेश हा सुद्धा विवाहित असून पत्नी व तीन मुलासह त्याच वसाहतीत वास्तव्यास होता दरम्यान पत्नी शुभांगी व आरोपी रुपेश मध्ये जुळलेले प्रेमसंबंध अधिकच घनिष्ठ होत असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण मृतक राजू ला कळताच कुटुंबात कौटुंबिक वादाला सुरुवात झाली होती दरम्यान या वादाला विराम देत कौटुंबिक सुखासाठी सहा महिन्यांपूर्वी ती शासकीय वसाहत सोडून भीमनगर येथे भाड्याने वास्तव्यास होता .काही काळ कुटुंबात सुखमय वातावरण सुरू असताच पुनःश्च आरोपी रुपेश व मृतक पत्नी शुभांगी च्या प्रेमाला उत आले व मृतकाच्या कुटुंबात कलह सुरू झाला .


तर सततच्या या कौटुंबिक वादाला कंटाळून मृतक राजू व आरोपी रुपेश व पत्नी शुभांगी सोबत काल जोरदार भांडण झाले .या भांडणाचा राग मनात धरून बसलेल्या आरोपीतानी प्रेमाचा काटा बनून असलेल्या पतीला कायमचा मिटविण्याच्या योजनेतून व घटनेच्या आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने पत्नी शुभांगी हिने योजनाबद्ध पद्धतीने नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून झोपेचे सोंग करीत मृतक पती गाढ झोपेत गेल्याचे संधी साधून प्रियकर रुपेश व त्याचा चुलत भाऊ हरीचंद्र ला घरात बोलावून रात्री 2 वाजता त्याचे दोन्ही हात बांधून त्याच्या तोंडावर उशी ठेवून जीवानिशी ठार केले.

दरम्यान मृतक ने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी केलेल्या आरडाओरड ची आवाज एका सामाजिक कार्यकर्त्याला पोहोचताच त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित नवीन कामठी पोलीस स्टेशन चे डी बी स्कॉड चे पप्पू यादव व मंगेश लांजेवार यांना माहिती दिली असता पोलिसांनी वेळेची कुठलीही तमा न बाळगता त्वरित घटनास्थळ गाठले असता आरोपीना रंगेहाथ पकडण्यात यश गाठले. सदर तिन्ही आरोपीना ताब्यात घेत त्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तर प्रेमाच्या आंधळ्या भावनेत 5 वर्षाचा मुलगा बापाच्या आश्रयातुन कायमचा दूर झाला . तसेच मृतक राजू हा अत्यंत साधा व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचा स्वाभाव शैलीचा होता मात्र पत्नीच्या प्रेमसंबंधाने तो कायमचा मृत्युमुखी पडून सुखी कुटुंबाला काळिमा फासण्यास बळी ठरला.

संदीप कांबळे कामठी