पुणे:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपयश आले.राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करत भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले.
भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन स्वतःची किंमत करून घेतली अशी टीका संघाच्या रतन शारदा यांनी केली. यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मला यासंदर्भात काहीही बोलायचं नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपलं मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे.
महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. त्यानुसार येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही ताकदीने कामाला लागले आहोत, असे अजित पवार म्हणाले.
शिक्षक ने परिवार संग गोदावरी में लगाई छलांग #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...
जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...
अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews
स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...
घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...





