Published On : Mon, Mar 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या अर्थसंकल्पासाठी महिलांनी मांडल्या महत्वाच्या सूचना

-मनपात अर्थसंकल्प संदर्भात महिलांचे विशेष चर्चासत्र
Advertisement

नागपूर,: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका स्थायी समितीच्या वतीने सोमवारी (ता. 09) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात अर्थसंकल्प संदर्भात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या नेतृत्वात व स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सदस्य श्रीमती अभिरुची राजगिरे, श्रीमती निरंजना पाटील, श्रीमती स्वीटी भिसीकर, श्रीमती मानसी सिमले, श्रीमती सानवी तरुडकर, श्रीमती मेरीस्टेला देवा उसरे, श्रीमती साधना बरडे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या.

या चर्चासत्रात अधिकारी, पत्रकार व राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवती यांना निमंत्रित करण्यात आले होते. यात डॉ. राजश्री धनंजय बापट, प्रा. श्रीमती आशा दयाशंकर तिवारी, डॉ. परिणीता परिणय फुके, श्रीमती सविता मोहन मते, श्रीमती सबानाज इर्शाद शेख, श्रीमती कल्पना नरेंद्र बोरकर, श्रीमती प्रवधा प्रवीण दटके या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या अपेक्षा व अभिप्राय यावेळी जाणून घेण्यात आले. तसेच त्यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

नागपूर शहराचा चांगला विकास व्हावा, याकरिता आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. प्रत्येक झोन कार्यालयात अर्थसंकल्पसाठी सामान्य नागरिकांच्या सूचना याव्यात म्हणून पेट्या देखील ठेवल्या आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महिलांच्या सूचनांना व विचारांना स्थान मिळावे, तसेच महिलांच्या दृष्टीकोनातून शहरातील गरजा आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी या चर्चेचे आयोजन करण्यात आले.

Advertisement

आपण सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे आपल्याला सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची जाणीव आहे, त्यामुळे या चर्चासत्रात दिलेल्या विचारांना नक्कीच अर्थसंकल्पात प्राधान्य दिले जाईल असे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले. तर स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी सांगितले की, आगामी मनपा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख व सर्वसमावेशक करण्यासाठी महिलांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. उपस्थितांच्या मार्फत प्राप्त सूचनांचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करतांना मोलाची मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपस्थितांनी चर्चासत्रात भाग घेत ‘कचऱ्याची योग्य विल्हेवाट, घराघरातून टाकलेल्या/उरलेल्या अन्नाची विल्हेवाट, भटक्या श्वानांचा त्रास, नाला स्वच्छता, उद्यानांची देखरेख, खाली प्लॉटमुळे होणारे त्रास, मनपा शाळांचा विकास, उत्कृष्ट शिक्षणपद्धती, शहरातील अतिक्रमण हटविणे, अंगणवाडी सुविधा, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ स्मार्ट टॉयलेट आदी विविध विषयांवर चर्चा करीत सकारात्मक सूचना मांडण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी नागपूरकरांकडून सूचना मागविल्या आहेत. यासाठी मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये सूचनापेटी ठेवण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी येत्या १५ मार्च पर्यंत आपल्या सूचना मनपाच्या सूचना पेटीमध्ये लेखी स्वरूपात किंवा क्युआर कोड च्या सहाय्याने डिजिटल स्वरूपात व्यक्त कराव्यात असे आवाहन स्थायी समिती सभापती यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.