
नागपूर:नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व १५१ उमेदवारांची आणि निवडणूक संचालन समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत निवडणूक संदर्भात सर्व उमेदवारांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांना संबोधित करताना निवडणूक प्रक्रियेत काय करावे आणि काय करू नये, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.शतप्रतिशत मतदान भाजपला कसे प्राप्त होईल याबद्दल मार्गदर्शन करून सर्व विजयाचे विक्रम मोडून नवा इतिहास रचू असा विश्वास व्यक्त केला.निवडणूक प्रमुख प्रा.संजय भेंडे यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवताना प्रचार यंत्रणा कशी प्रभावीपणे राबवावी,यावर प्रकाश टाकला.
सुधीर देऊळगावकर यांनी प्रशासकीय परवानग्या आणि तांत्रिक बाबींची माहिती दिली, तर राजेश बागडी यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार खर्चाचे नियोजन कसे असावे,यावर उमेदवारांना मार्गदर्शन केले.बैठकीमुळे उपस्थित सर्व उमेदवारांमध्ये प्रचारासाठी मोठा उत्साह दिसून आला.आपल्या अध्यक्षीय भाषणात शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी विश्वास व्यक्त केला की,”पक्षाची ताकद बूथ व्यवस्थापन असून बूथ मजबूत असेल तर यश निश्चिय आहे असे सांगून मतदार यादी नुसार प्रचार कसा करावा व संपर्क कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले 120 चा आकडा गाठतांना ट्वेंटी ट्वेंटी प्रमाणे प्रदर्शन करणे गरजेचे आहे उमेदवाराची भूमिका समाजात वावरतांना नवरदेवासारखी न राहता मुलीच्या वडिलांसारखी असावी असा मिश्किल पणे सांगताना पक्षाची ताकद पाहता महानगरपालिकेत विजय आपलाच आहे.”असा विश्वास व्यक्त केला.यावेळी काँग्रेस चे माजी उपमहापौर हिम्मतराव सरायकर यांचे पुत्र संजय सरायकर व माजी नगरसेवक हरी भाऊ यादव यांनी आपल्या समर्थकासोबत भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रशेखर बावनकुळे व दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश घेतला यावेळी भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी मंचावर संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके,आमदार कृष्णा खोपडे,आमदार मोहन मते,आमदार संदीप जोशी,माजी आमदार अनिल सोले,माजी आमदार गिरीश व्यास,शहर महामंत्री श्रीकांत आगलावे,संदीप जाधव,रितेश गावंडे,संपर्क महामंत्री विष्णू चांगदे आणि सह संपर्क मंत्री बाल्या बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन विष्णू चांगदे यांनी केले.








