Published On : Tue, Jan 11th, 2022

मनपात तातडीने ‘कॅफो’ची नियुक्ती करा

महापौर दयाशंकर तिवारी यांचे नगरविकास मंत्री व सचिवांना पत्र

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत सध्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. यामुळे अनेक कार्य प्रलंबित आहेत. ह्या पदावर तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व नगर विकास विभागाच्या सचिवांकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

सदर पत्रात नमूद केल्यानुसार, यापूर्वीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी ३१ डिसेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्त आहे. मागील महिन्यातच नागपूर जिल्ह्यात विधानपरिषदेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता होती. तेव्हा आचारसंहितेमुळे आणि आता सदर पद रिक्त असल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत.

यामुळे महानगरपालिकेच्या वित्तीय कामकाजावर व विकास कामानवर प्रतिकुल परिणाम होत असल्याची खंत महापौरांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या बाबी लक्षात घेता तातडीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे रिक्त पद तातडीने भरण्यात यावे, असे पत्रात नमूद केले आहे.