Published On : Tue, May 15th, 2018

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर झोन येथे पर्यटकांची अवैद्यरित्या वाहतूक

Tadoba Andhari Tiger Reserve

File Pic

चिमूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर झोन अंतर्गत जे चारचाकी जिप्सी वाहन पर्यटकांना  प्राणी दर्शनासाठी सवारी म्हणून वापरली जातात तेथील संपूर्ण वाहनांची दस्तावेज अपूर्ण असून येथे  पर्यटकांची अवैद्यरित्या वाहतूक होत आहे. परंतु याकडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प  (बफर) उप संचालक यांचे तसेच परिवहन विभाग (R.T.O.) यांचे दुर्लक्ष होत आहे.

येथे वापरात येणाऱ्या  काही जिप्सी चालकांकडे लर्निंग लायसन्स असून सर्रासपणे पर्यटकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. असे २ वर्षापासून सुरु असून याकडे परिवहन विभाग चंद्रपूर तसेच बफर अधिकारी यांचे पण दुर्लक्ष होत आहे. कुठलाही चालक कोणतीही जिप्सी वाहन जंगल सफारीस पर्यटकांना प्राणी दर्शन करण्यास सवारी मारीत असतो.

पर्यटक प्रवासी अवैधरित्या जिप्सी मधून प्राणी दर्शनास वाहून नेले जाते. परंतु याकडे परिवहन विभाग तसेच वनमंत्री व बफर झोन कर्मचारी यांचे नियमित दुर्लक्ष होत असून या संपूर्ण जिप्सी चालक व जिप्सी मालक तसेच बफर अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची मागणी कित्येक वेळा नागरिकांनी मोबाईल च्या माध्यमातून केली असता कुठलाही अधिकारी यावर ठोस उपाययोजना करीत नाही . याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement