Published On : Fri, Jun 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील जरीपटका परिसरात कपड्यांच्या दुकानातून ई-सिगारेटची अवैध विक्री; गुन्हे शाखेची कारवाई

१.८७ लाखांचा साठा जप्त
Advertisement

नागपूर : शहरातील जरीपटका भागातील एका कपड्यांच्या दुकानातून प्रतिबंधित ई-सिगारेटची अवैध विक्री होत असल्याचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने केला आहे. गुरुवारी (१९ जून) सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे “नॉनसेन्स क्लोथिंग शॉप” या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी सुमारे ₹१,८७,८५० किमतीचा साठा जप्त केला.

ही कारवाई १९ जून २०२५ रोजी सायं. ७.४० ते ८.४० दरम्यान करण्यात आली. ही कारवाई जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडली. छाप्यात ६२ ई-सिगारेट, २ मोबाइल फोन, एक डीव्हीआर आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी दोघा व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे :

जितेंद्र मंगीलाल सोलंकी (३६ वर्षे), रा. राजनगर, सादर, नागपूर – दुकानाचा मालक
योगेश हरिभाऊ चंदेकर, रा. जरीपटका – कर्मचारी
या आरोपींविरोधात ई-सिगारेट प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४, ५, ७ आणि ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, दुकानात कपड्यांच्या आड ई-सिगारेटची विक्री गुपचूप केली जात होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पंचनामा करून संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी नागरिकांना अशा अवैध व्यापाराच्या विरोधात माहिती देण्याचे आवाहन केले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.