Published On : Fri, Jul 3rd, 2020

पोलिसच करतात नागरिकांकडून अवैध वसुली

– जुना कामठी पोलिसांचा प्रताप

नागपूर : पोलिसांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कोरोनायोद्ध्याची भूमिका बजावली. शहरातील व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यात पोलिसांनी वाखान्याजोगे काम केले. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कोरोनाचा संसर्ग बºयाच प्रमाणात आटोक्यात आणता आला. मात्र जुना कामठी येथील काही पोलिस कर्मचारी याला अपवाद असून सामान्य व निरापराधांना नाहक त्रास देण्याचे काम करीत असून अवैध वसुली करीत असल्याची तक्रार राष्टÑवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे (नागपूर जिल्हा) अध्यक्ष शोएब असद, आमदार प्रकाश गजभिये यांचे निकटवर्तीय विजय गजभिये यांनी पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली आहे.

राष्टवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे पो. आयुक्त व गृृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जुना कामठी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी ईमरान शेख आणि सैय्यद हे दोघे सामान्य नागरिकांना नाहक त्रास देतात तसेच अवैध वसुली करतात.

पेट्रोलिंग दरम्यान निरापराध लोकांना घाबरवून व दबाव तंत्राचा वापर करीत तसेच कारवाई करण्याची धमकी देत पैशाची वसुली करतात. रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान ड्युटीवर मद्यधुंदावस्थेत असतात, नागरिकांना, दुकानदारांना अश्लिल शिविगाळ करतात. रेतीची अवैध तस्करी तसेच जनावरांची तस्करी करणाºयांकडून हप्ता वसुली करतात, असा आरोपही रा.कॉंं. अल्पसंख्यांक विभागाचे शोएब असद यांनी केला.

जुना कामठी पोलिस ठाण्यातील पो.शिपाई ईमरान शेख व सैय्यद यांच्याकवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पो.आयुक्त, गृृहमंत्री आणि पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.