Published On : Wed, Sep 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

भांडेप्लॉटमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सेवादल नगरात पोलिसांची कारवाई; देशी-विदेशी दारूसह रोकड जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement

भांडेप्लॉटमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : भांडेप्लॉट परिसरातील सेवादल नगरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीवर पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने कारवाई केली. एका घरावर छापा टाकून देशी-विदेशी दारूसह रोख रक्कम असा एकूण २५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगळवारी रात्री एस्कॉर्ट पथक शहरात गस्त घालत असताना संदीप सूर्यभान उरकुडे हा घरातून देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी केल्यानंतर एपीआय भगवान कोळी यांनी सक्करदरा पोलिसांना सोबत घेत कारवाई केली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता १५ हजार २७० रुपयांची विदेशी दारू, ८ हजार रुपये किमतीच्या संत्रा देशी दारूच्या २०० बाटल्या आणि १ हजार ८०० रुपये रोख असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संदीप उरकुडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख एपीआय भगवान कोळी, पीएसआय चेतनसिंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.