नागपूर : शहारातील कामठीच्या खैरीमध्ये गावातील संगम फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी 17 जुगारांना अटक करून 26 लाखांचा माल जप्त केला.
पोलिसांनी आरोपींकडून 60,440 रुपये रोख, 52 पत्ते, तीन चारचाकी, पाच दुचाकी आणि एकूण 25,99,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक केलेल्या १७ आरोपींमध्ये नागपूर जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे.