Published On : Tue, Jul 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर …; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना सणसणीत प्रतिउत्तर

Advertisement

नागपूर : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात त्यांच्यावर सडकून टीका केली. सध्या ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपुरात शिवसैनिकांना मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी ट्वीट करत ८ मुद्द्यांच्या माध्यमांतून उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले.

स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी ! असा मोलाचा सल्ला फडणवीस यांनी दिला. ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचबरोबर पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
पोलीस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
करोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
या आठ मुद्दयांवर फडणवीस यांनी प्रकाश टाकला आहे. याला आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.