Published On : Tue, Mar 19th, 2019

मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य ओळखपत्रावर आता करता येणार मतदान

Advertisement

indian-voters1-600x355

नागपूर: लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 तसेच पोटनिवडणुकीकरिता मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाही, अशा मतदारांना मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कागदपत्रे देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

यामध्ये पारपत्र, वाहन चालक परवाना, केंद्र, राज्यशासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीतील ओळखपत्र, बँक तथा पोस्टाद्वारे वितरीत छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या द्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गंमित स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, श्रम मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत निर्गमित हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार तथा आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र तसेच आधार कार्ड ही ओळखपत्रे मतदानाकरिता ग्राह्य धरण्यात येतील.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement