Published On : Fri, Aug 14th, 2020

ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास डॉक्टरांनी रुग्णाला कोविड हॉस्पिटलला पाठवावे -जिल्हाधिकारी

नागपूर: जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. साधारणत: 70 टक्के जवळपास मृत्यू हे वेळेत निदान न झाल्याने, भीतीपोटी, ताप, खोकला किंवा लक्षणे लपवून ठेवल्याने झाल्याचे आढळले आहे. खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची आक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिले.

नागपूर ग्रामीण येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. तेथील कोविड कंट्रोल रुमला त्यांनी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अविनाश कातडे यावेळी उपस्थित होते. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करतेवेळी रुग्णाची मेडिकल हिस्ट्री घ्यावी. रुग्णाची अँटिजेन टेस्ट करावी. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरपीसीआर टेस्ट करावी. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी. अँटिजेन टेस्ट करतेवेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीम देखील सोबत ठेवावी.

Advertisement

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील कंट्रोल रुमची पाहणी केली. त्यानंतर बुटीबोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत चर्चा केली. पुढील दोन ते अडीच म‍हिने अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर संवाद यात्रेचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी श्री. परिहार यांना दिली.

कोरोनाबाबत ग्रामीण भागामध्ये चुकीचा प्रसार करण्यात येत आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास न ठेवता तपासणीसाठी पुढे यावे. बुटीबोरीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील लोकांना आवाहन करुन चाचणीसाठी प्रोत्साहित करावे. चाचणीत कोणताही विलंब नको. विलंब केल्याने आपण स्वत:सोबतच दुसऱ्याचा देखील जीव धोक्यात टाकत असल्याची जाणीव सूज्ञ नागरिकांनी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. बुटीबोरी येथील बैठकीला नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, तहसीलदार मोहन टिकले उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement