Published On : Tue, Apr 21st, 2020

किराणा दुकानात दरपत्रक न लावल्यास 2 हजार रुपये दंड होणार

कामठी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शहरात लॉकडाऊन सह संचारबंदी व जमावबंदी कायदा लागु केला आहे फक्त जीवनावश्यक वस्तू वर सूट देत इतर सर्व व्यवहार वर बंदी घातली आहे या काळात जीवणावश्यक वस्तू तसेच किराणा दुकानदारांकडून चढ्या भावाने विक्री केली जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी च्या आदेशांनव्ये सर्व किराणा,जीवनावश्यक वस्तूच्या विक्रेत्यांनी दुकानाच्या प्रथमदर्शनी भागात . दरपत्रक लावणे बंधनकारक आहे दरपत्रक लावले नसलेल्या दुकांनदारावर आदेशाचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली प्रथम 2 हजार रुपये दंड आकारण्यात येईल तर दुसऱ्या वेळी सरळ फौजदारी कारवाही करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिली आहे.

शहरातील सार्वजनिक स्थळावरील बाजार, रुग्णालय , कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्यास प्रथम 500 रुपये दंड व त्यानंतर फौजदारी कारवाही करण्यात येणार आहे.सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरनाऱ्या नागरिकांवर 200 रुपये दंड व नंतर फौजदारी कारवाही करण्यात येणार आहे.दुकानदार , फळ भाजीपाला , विक्रेते , सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टनशन न राखल्यास ग्राहकाला 200 रुपये दंड तसेच आस्थापना मालक,दुकानदार व विक्रेत्यास 2000 रुपये दंड लावण्यात येईल.

तेव्हा सदरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतोय दंड संहिता 1860 चे कलम 188 अनव्ये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मान्य करून तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध कायदा 1897 महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 अंतर्गत संबंधितावर कारवाही प्रस्तावित केली जाईल


किराणा दुकानातुन लॉकडॉउन चा सर्रास उडतोय फज्जा
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामठी शहरात लॉकडाऊन लागू करून जीवनावश्यक वस्तू च्या विक्री वर सूट देत खर्रा, तंबाकू , सिगारेट आदींवर विक्रीस बंदी घातली आहे मात्र सूट असलेल्या किराणा दुकानातून तंबाकू विक्री सह सिगारेट विक्री जोमात सुरू आहे तसेच खर्रा विक्री सुद्धा गुप्तचर पद्धतीने चढ्या भावाने सुरू आहे त्यातच दारू सुद्धा चढ्या भावाने विक्री होत असून तळीराम त्याही चढ्या भावाने अवैधरित्या मिळत असलेली दारू विकत घेऊन मन तृप्त करीत आहे तेव्हा प्रशासनाणे या लॉकडाऊन चा फज्जा उडवणाऱ्यावर कारवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संदीप कांबळे कामठी