Advertisement
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच आज (९ एप्रिल) मुंबईत मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, त्यापूर्वी मनसेच्या महायुतीतील सामील होण्याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे जर महायुतीत येणार असेल, तर आम्हाला त्याचा आनंदच आहे.पण राज ठाकरेंनी महायुतीत यावे की नाही, हा वरिष्ठ पातळीवरील चर्चेचा विषय आहे. मी याविषयी भाष्य करणं योग्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वत: राज ठाकरे यावर चर्चा करणार असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले.
समविचारी पक्ष एकत्र आले तर लोक सकारात्मक पद्धतीने मतदान करतील, असेही ते म्हणाले.