मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार, असे ते म्हणाले. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका अशी तंबीही त्यांनी बँकांना दिली.
Featured Products
राज्यस्तरीय बँकर्स समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
मागील वेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील,असे फडणवीस म्हणाले.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तसंच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Advertisement









