Published On : Mon, Apr 5th, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमध्ये नैतिकता असेल तर राजीनामा दयावा : आ.कृष्णा खोपडे

Advertisement

नागपूर : उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सर्व क्षेत्रात अपयशी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. या दिड वर्षाचे कालावधीत धनंजय मुंडे, संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांचे काळे कारस्थान महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेली आहे. वाझे / परमवीरसिंग प्रकरणात त्याच वेळेस देशमुखांचा राजीनामा घेतला असता तर त्यांची नैतिकता दिसली असती. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भ्रष्ट्राचाराचे महामेरू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. उद्धव ठाकरे हे राज्यातले पहिले अपयशी मुख्यमंत्री ठरल्यामुळे त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा दयावा.

उच्च न्यायालयाचे स्वागत ! पण देशमुखांची नैतिकता कसली?
जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात गंभीर बाब असल्यामुळे सी.बी.आय. चौकशीचे आदेश त्यांचे सर्वांनी स्वागत केले असून अनिल देशमुखाचा राजीनामा यात नैतिकता कसली? परमवीर सिंग यांनी ज्या दिवशी 100 कोटींचा आरोप लावला होता. त्याच दिवशी राजीनामा दिला असता टर त्यांची नैतिकता सिद्ध झाली असती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनिल देशमुख यांनी नियमात बदल करून सीबीआय राज्यामध्ये कोणतीही चौकशी करणार नाही, असे त्यांनी वाजा-गाजा करून आदेश काढले होते. उच्च न्यायालयाने परमवीर सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे तोंड काळे झाले आहे. आता सीबीआय चौकशीला थांबवणार आहे कां?

फक्त मुंबई येथील 100 कोटी खंडणीमध्ये कॉंग्रेसचा हिस्सा किती ?

Advertisement

कॉंग्रेसचे पप्पू व शिवसेनेचा पोपट यांचे तोंड बंद कां?
फक्त मुंबई येथील 100 कोटीचा प्रति महिना खंडणी प्रकरणात कॉंग्रेसचा हिस्सा किती? हे आता कॉंग्रेसचे पप्पू नाना पटोले यांनी जाहीर करावं, या तिकडम सरकारमध्ये कॉंग्रेसची महत्वपूर्ण भूमिका असून नामुष्की झाली असल्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगावं. शिवसेनेचे बोलके पोपट संजय राऊत खामोश कां? त्यांनी सांगाव की मुख्यमंत्र्यांचा हिस्सा किती होता?

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.