Published On : Sat, May 26th, 2018

ऑडिओ क्लिपमध्ये मोडतोड झाली असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत : अनिल परब

Advertisement

Anil Parab

मुंबई: शिवसेनेकडून जी ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली आहे त्यावर आता बरेच राजकारण सुरु झाले आहे. आता शिवसेनेकडूनही आव्हानात्मक उत्तर आलेय. आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना आमदार अनिल परब यांनी थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले, सुदैव आहे की मुख्यमंत्र्यानी हे मान्य केले की तो आवाज त्यांचा आहे. ऑडिओ क्लिपमधील भाषा मुख्यमंत्र्याना शोभनिय नाही. जर क्लिप तोडून मोडून दाखवली, असा त्यांचा दावा असेल तर त्यांना आमचे जाहीर आवाहन आहे. या क्लिपबाबत आजच्या आज फैसला करण्यात यावा.

अनिल परब म्हणाले, आम्ही चुकीचे असू तर जी सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्रीही आहेत. फॉरेन्सिक लॅब त्यांच्या अधिपत्याखाली आहे. त्यांनी आयोगाला विनंती करावी की आजच्या आज निर्णय घ्यावा. तज्ज्ञ बोलवा, लोकप्रतिनिधी बोलवा.

समोरासमोर तपासून घ्या की ही एडिटेड क्लिप आहे का? पण त्यात काही मोडतोड झाली नसेल तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल यांनी केला आहे.