छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. यावर आता स्वतः दानवे यांनी स्पष्टीकरण दिले. मी शिवसेना सोडणार नाही, भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेतच लढणार आहे. खैरे आणि माझ्यात वाद नाही. नाराज असल्यावर पक्ष सोडतात का? असा उलट सवालही दानवे यांनी उपस्थित केला. चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाने तिकिट दिले.तिकिट दोन तीन जणांनी मागितले म्हणजे मतभेद होत नाही.८ दिवसात संभाजीनगरचा प्रचार करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान आपल्याला महायुतीकडून कोणतीही ऑफर आली नसल्याचेही ते म्हणाले.मी भाजपात होतो आणि ABVP चे काम केले. मात्र गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे काम करत असल्याचे ते म्हणाले.