Published On : Mon, Mar 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मी पुन्हा येईल म्हटले होते, दोन पक्ष फोडून पुन्हा आलो; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचले

Advertisement

नागपूर: देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले.मी पुन्हा येईल असे म्हटले होते. अडीच वर्षांनी का होईना पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी आम्हाला जिंकून दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघातही फडणवीस यांनी केला. ‘काँग्रेस नसती तर काय झालं असतं? या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जुंपली. ‘काँग्रेस न होती तो क्या होता’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलताना फडणवीसांनी केलेल्या टिकेला राऊतांनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिले.

काँग्रेस पक्ष नसता तर कदाचित भारताचे विभाजन झाले नसते. सामाजिक आर्थिक दरी निर्माण झाली नसती. आज पीएम मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक स्तरावर आपली प्रतिमा झाली ती लवकर झाली असते. आज सशक्त राजकारण देश होताना दिसत आहे. महाराष्ट्राने सत्ता आणि पैसे आणि त्यावर राजकारण असे समीकरण केले. सरकारी पैशावर संस्था पैसा सत्ता काबीज केल्याचे दिसून आले.

राज्यातील 50 कुटुंब जे राज्य राजकारण चालवतात. काहीजण सामाजिक इतिहास काम नक्कीच होते पण त्यातील काहीजण मात्र सत्ता कायम कंट्रोल ठेवण्यासाठी राजकारण करत होते. आपल्या लोकांची मानसिकता झाली पण प्रमाण राजकारण काँगेस होते. घराणेशाही त्यांच्या पक्षात कायम दिसते. परिवारवाद अर्थ राजकारणात येऊ नये असे नाही तर त्याच्या जीवावर यावे, इतरांने अन्याय करत परिवारात फक्त संधी नको इतकेच. खरगे अध्यक्ष पार्टीचे पण निर्णय सोनिया अथवा राहुल गांधी घेतात. काल अमित शाहा यांनी सांगितले एनसीपी का फुटली तर अजित पवार एवजी मुलगी पुढे आली.आदित्य ठाकरे यांचे ही तसच झाले. विचार सोडून सत्ता काबीज करण्यासाठी मुलांना संधी दिल्या, असे फडणवीस म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.