नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आजही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडली नाही. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज देत तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे म्हटले.
अनेक वेळा सांगितले, आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या, असे चँलेज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. आज निवडणूक होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत.
पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही, हे घटनाबाह्य सरकार असल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचे चँलेज दिले होते. ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.