नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला.यादरम्यान एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. खोपडे यांच्या समर्थकांनी त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्यास सुरुवात केली. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खोडपे यांनी ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत या संदर्भात भाष्य केले.
मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी रागावलेलो नाही किंवा दुखावलेलोही नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्व नागपुरातून जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे मी चौथ्यांदा निवडून आलो,असेही खोपडे म्हणाले. तसेच माझ्या समर्थकांना मी राजीनामा देऊ नका अशी विनंती केली असून ते लवकरच सर्व काही शांत होणार असल्याचे खोपडे म्हणाले.
विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या ईव्हीएम विरोधावरही खोपडे यांनी भाष्य केले. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यात ईव्हीएम चांगली आहे. मात्र ज्या राज्यात भाजपची सत्ता आली त्या राज्यात विरोधकांकडून ईव्हीएमचा विरोध करण्यात येत असल्याचे खोपडे म्हणाले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





