
छगन भुजबळ म्हणाले की, “सरकार स्थापनेच्या वेळी मला मंत्री करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा पक्षाचा निर्णय झाला आणि मी मंत्री झालो नाही. आता पक्षाच्या निर्णयानुसार मी मंत्री झालो आहे.”
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुलासा-
महाराष्ट्र सदन प्रकरणावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ८० पानांचे निकाल देत मला आणि इतर संबंधितांना निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे आता त्या प्रकरणावर टीका करणे योग्य नाही. महाराष्ट्र सदन तयार आहे, मात्र सरकारने अद्याप त्यासाठी निधी दिलेला नाही.”
ओबीसी समाजासाठी संघर्ष सुरूच-
ओबीसी समाजाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, सरकारमध्ये असो वा नसो, ओबीसी समाजासाठी आमचा लढा कायम राहील. मंत्रिपद असल्यामुळे तो लढा अधिक प्रभावीपणे लढता येतो. मी केवळ ओबीसी समाजाचा नाही, तर राज्यातील सर्व नागरिकांचा मंत्री आहे.”
विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर-
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत भुजबळ म्हणाले,माझ्यावर टीका करणाऱ्यांना सांगू इच्छितो की मी न्यायालयाच्या आदेशानुसार निर्दोष आहे. आता पुन्हा पुन्हा जुन्या प्रकरणांचे संदर्भ देत बदनामी करणे योग्य नाही.