Published On : Fri, Apr 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मी शरद पवारांचा ऋणी असून येत्या १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार: एकनाथ खडसे

Advertisement

मुंबई: भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत.स्वत: खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतत असल्याची माहिती दिली.माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचे म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे त्यांना कळवले होते.परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल, असे खडसे म्हणाले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र खडसे यांना याबाबत खुलासा करत माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर नवी दिल्ली येथे होईल, असे सांगण्यात आल्याचे खडसे म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.