Published On : Thu, Nov 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-तुळजापूर महामार्गावर कारच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Advertisement

नागपूर : महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पवनार परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास दुचाकी चालवीत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना भरधाव येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात अवधूत वैरागडे (वय ६० वर्ष) व चित्रा वैरागडे (वय ५५ वर्ष) दोघेही रा. केळझर, असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, अवधूत वैरागडे व त्यांच्या पत्नी चित्रा हे दोघेही दुचाकीने वर्धा येथून (Wardha News) नागपूरकडे जात होते. याचदरम्यान भरधाव कारने दुचाकीला धडक (Car Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अवधूत वैरागडे यांचा रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला होता.

तर त्यांच्या पत्नी चित्रा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पती-पत्नीचा एकाच वेळी अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असूनही अपघातग्रस्त कार सेलू येथील अरविंद सोमनाथे यांची असल्याचे उघडकीस आले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.