Published On : Wed, Apr 18th, 2018

चक्रीवादळाने केला घात, टाटा 407 खाली दबून दोघांचा मृत्यु

Hurricane, 2 killed by hitting Tata 407
रामटेक: मानसिंग देव अभयारण्याला लागून असलेल्या सत्रापुर गावापासुन 1 की मि अंतरावर असलेल्या घटाटे मालगुजारी तलावात सदाफुली (बेशरम) झाडांची तोड़नी झाल्यानंतर गाडीच्या सावलीत जेवन करायला बसलेल्या कामगारांच्या अंगावर आज दुपारी 12.30 च्या सुमारास 407 गाड़ी क्र एम एच 31 – एम 6350 चक्रीवादळाने उलटुन गाडी खाली दबलेल्या चालक महेश शंकर जामखुरे – वय 26, व सुनीता पंचम ताकोद – वय 35 दोघेही रा. कान्द्रि वस्ती, ता. रामटेक यांचा जागीच मृत्यु झाला तर इतर चार स्त्रिया यात सुखरुप वाचल्या.

सविस्तर व्रुत्त असे की मनसर पासून माहुली मार्गावर असलेल्या रैक पॉवर बायोमास प्लान्ट मध्ये विज तयार करायला सगळ्याच प्रकारचा कचरा, कुटार, तुराटया, पराटी, बेशरम ( सदाफुली ) टनाच्या हिशेबाने विकत घेतल्या जाते, त्यामुळे मनसर परिसरातील प्रत्येक तलावातील सदाफुलीची तोड़नी मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्यामुळे वाहन मालक व कामगाराना सुद्धा रोजगार उपलब्ध होत असतो. अशातच आज कान्द्रि येथील 407 चे मालक शंकर काशीराम जामखुरे रा कान्द्रि वस्ती यांचा मुलगा महेश शंकर जामखुरे 26, त्याची आई माया शंकर जामखुरे 45, लक्ष्मी श्रीहरि ऊके 30, निर्मला मनोहर नान्हे 40, सुनीता पंचम ताकोद 35, आणि त्रिवेणी गजानन सोनटक्के 39 हे सर्व कान्द्रि पासून 6 की मि अंतरावर जंगलात असलेल्या सत्रापुर गावातील मालगुजारी घटाटे तलावात सकाळी सदाफुली ( बेशरम ) तोडायला गेले, सदाफुलीचे गट्ठे बांधुन झाल्यानंतर सर्व गाडीच्या सावलीत दु 12.30 वा. जेवन करायला बसले असता त्याच दरम्यान चक्री वादळ आले व याच चक्री वादळाच्या जोराने 407 मिनीडोर उलटला यात या सहापैकी दोघे गाडीखाली दबल्या गेले व यातच त्यांचा मृत्यु झाला, मृतकांमध्ये महेश शंकर जामखुरे 26 व सुनीता पंचम ताकोद 35 दोघेही रा कान्द्री वस्ती यांचा समावेश असून इतर चार स्त्रियांना किरकोळ मार सुद्धा लागलेला नाही.

Hurricane, 2 killed by hitting Tata 407
तलाव जंगलात असल्याने सगळीकडे स्मशान शांतता असल्याने कुणीही मदतीला धाऊ शकले नाही, गाडी उलटताच वाचलेल्या चार स्त्रियांपैकी एक स्त्री मदतीकरिता धावत सत्रापुर गावात गेली, दहा पंधारा लोक मदतीला धावले मात्र तोपर्यंत खुप वेळ होऊन गेला होता.

Advertisement

माहिती मिळताच कान्द्री येथील लोकांनी सत्रापुर कडे दाव घेतली बघता बघता तलावात लोकांची गर्दी जमली यापैकी एकाने पारशिवनी पोलिसांना सुमारे 1 वा. च्या सुमारास घटनेची माहिती दिली, मात्र पारशिवनी पोलिस 3 तास उशिरा घटनास्थळी पोहचली, त्यानी ताबोडतोब पंचनामा करुण दोन्ही मृतदेह उत्त्तरीय तपासणी करिता पारशिवनी येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. पोलिस निरीक्षक दीपक डेकाटे यांच्या मार्गदर्शनात संजय शिंदे, प्रमोद कोठे, अनिल मिश्रा आणि विजय बिसेन करित आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement