नागपूर: महाशिवरात्री निमित्त उपवासासाठी नागपूरच्या गोळीबार बाजारपेठेतून खरेदी केलेल्या शिंगाड्याच्या पिठातून शेकडोना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषबाधित नागरिकांना शहरातील मेयो रुग्णालय,विम्स रुग्णालय आणि शांतीमोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिंगाड्याच्या पिठातून बनलेले पदार्थ खाल्याने १०० च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांना पोटदुखी,उलट्या आणि दस्तसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. परिणामतः बाधितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वृत्त संपूर्ण शहरात वाऱ्यासारखे पसरले.
‘नागपूर टुडे’शी बोलताना शिवसेना अध्यक्ष राम कुकडे यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.
नागपुरातील फार जुने बाजारपेठ असलेल्या गोळीबार चौकातून व्यापाऱ्यांनी एक्सपायरी डेट झालेल्या शिंगाड्याच्या पिठावर नवीन तारखेचे स्टिकर चिटकवून ग्राहकांना ते विकले. मात्र त्यामुळे अनेकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.