Published On : Mon, Mar 14th, 2022
By Nagpur Today Nagpur News

६ व्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उदंड प्रतिसाद

– ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते यांच्या उपस्थितीत समारोप ,युवकांपासून जेष्ठांनी घेतला चित्रपटांचा आस्वाद

नागपूर – पूर्ण क्षमतेने सुरू झालेले चित्रपटगृह आणि 16 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे खऱ्या अर्थाने 6वा ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महित्सव स्मरणीय ठरला। वैविध्यपूर्ण पूर्ण विषयांवरील दर्जेदार चित्रपट आणि दिग्दर्शक अभिनेते यांच्या सोबत दिलखुलास गप्पा यंदा प्रेक्षकांना करता आला। युवक युतींपासून ते ज्येष्ठ नागरिकांना चित्रपटांना गर्दी केल्याचे दिसून आले । एकूणच ६ व्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणात महोत्सव करण्याची ऊर्जा मिळाल्याचे आयोजन समितीचे प्रमुख डॉ चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरचे रसिक चोखंदळ – समर नखाते
निवडक चांगल्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद. सिनेमा विषयी जाणून घेण्याची आवड. युवा वर्गाचा उत्साह आणि चित्रपट अनुभवण्याची हौस या वरून नागपूरचे रसिक चोखंदळ असल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक समर नखाते यांनी सांगितले. सिनेमा साठी एकत्र आल्याने सोशल सेन्सिबीलीटी दिसून येत असे देखील ते म्हणाले. चित्रपटांमध्ये संपूर्ण जग एकत्र आणायची ताकद असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सर्वच चित्रपट हाऊसफुल – १६ चित्रपट दाखविण्यात आले आणि सर्वच हाऊसफुल शो ठरले. आयोजन समितीचे सचिव विलास मानेकर आणि अन्य सदस्यांनी यासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. महोत्सव अधिक कालावधीचा असावा अशी मागणी समारोपाच्या वेळी उपस्थित रसिकांनी केली. दरम्यान आयोजकांनी सिनेपोलिस चे आभार व्यक्त केले असून व्यवस्थापक चेतन जाधव नई व्ही आर मॉल चे व्यवस्थापक अशोक चौधरी यांचे विशषेश सहकार्य लाभल्याचे म्हंटले आहे. नागपूर मनपा च्या सहकार्याबद्दल आयोजन समिती ने आभार व्यक्त केले आहे.

Advertisement
Advertisement