Published On : Tue, Jan 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आरोपीला न्यायमूर्ती उघडपणे कसे भेटतात? आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

नागपूर : आमदार अपात्रता प्रकरणात १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत. लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

लवाद म्हणून विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमचा जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे. आज उल्हास बापट यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी म्हटले आहे की दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात दोन वर्षे काढली आहेत. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणं सुरु आहे त्यामुळे लोकशाहीचा खून होतो आहे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement