Published On : Thu, Oct 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्यांनी पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? नागपुरात रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

Advertisement

शेतकऱ्यांनी पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? नागपुरात रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर : शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत तुटपुंजी असून, या रकमेत संपूर्ण कुटुंबाची दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला. राज्यातील दुष्काळग्रस्त महिलांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.

रोजगार बुडण्याच्या भीतीने महिलांवर गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या. दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्या आणि व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असून, त्यांच्या परिस्थितीचा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधान परिषदेच्या पाच जागांपैकी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास काय निकाल लागू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या विजयात महायुतीतील काही नेत्यांचाही सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.