Published On : Fri, Oct 15th, 2021
By Nagpur Today Nagpur News

होटल Empire Grill Family Restaurant वर स्थानिक गुन्हे शाखाची धाड

सावनेर – नागपूर ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात आरोपी शोध बाबत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पो.स्टे.खापरखेडा अंतर्गत सावनेर – नागपूर महामार्गावरील Empire Grill Family Restaurant येथे मोठ्या प्रमाणावर अवैद्यरित्या विदेशी दारूची विक्री व दारूचा गुत्था सुरू आहे .अशी माहिती मिळाल्याने पंच व पो.स्टाफसह नमूद ठिकाणी कार्यवाही केली असता.

तिथे विदेशी दारू , बीयर व हुक्क्याचे साहित्य ज्यामधे हुक्का पॉट, हुक्का चीलम, पाइप, ई.व वेगवेगळ्या ३ प्रकारचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण १२१००/- रु. चा मुद्देमाल मिळून आला.
घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही पूर्ण करून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे हॉटेल मालक विरूध्द ६५(ई),८३,८४ मदाका सह कलम ४,२१ सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन अधिनियम २००३ सह कलम ३३/१३१ महा.
पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. संपूर्ण मुद्देमाल व गुन्ह्याची कागदपत्रे व दोन आरोपी वैद्यकीय चाचणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोलीस स्टेशन खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकूण मिळून आलेला मुद्देमाल:-
१) रॉयल स्टाग व्हिस्की २ नग, Tuburg बीयर १ कॅन, २) Almarkesh Deputy commissioner, Afzal Pan Raas, Almarkesh Brain Freez, अशा विविध कंपनीचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू हुक्का , ८ नग हुक्का पॉट, ९ पाइप व इतर साहित्य असा एकूण १२१००/- रू. चा मुद्देमाल.

अटक करण्यात आलेले आरोपी:-
१) स्नेहल संजय रामटेके, वय २८ वर्ष रा. फ्रेंड्स कॉलनी ,नागपूर
२)शक्तीकुमार फुलेलचंद शर्मा, वय ३५ वर्ष रा. Empire Grill Restaurant दहेगाव रंगारी, नागपूर. कार्यवाही पथक:- पो.नी. श्री अनिल जिट्टावार ,स.पो.नी. राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, अनिल राऊत, पो.हवा. विनोद काळे, गजेंद्र चौधरी, मदन आसटकर, पोना अरविंद भगत, पो.शी. विरेंद्र नरड, अमृत किनगे, विपीन गायधने, अमोल वाघ, रोहन डाखोरे यांनी पार पाडली.

दिनेश दमाहे

Advertisement
Advertisement