Published On : Wed, Feb 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात केरळच्या नवनियुक्त भाजप लोकप्रतिनिधींचे ‘विदर्भीय’ पद्धतीने आदरातिथ्य आणि जंगी स्वागत

Advertisement

​नागपूर: केरळमधील तिरुवनंतपुरम येथील नवनिर्वाचित भाजप महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेते, केरळ प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष तसेच नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांचे आज नागपूर रेल्वे स्थानकावर अभूतपूर्व वैदर्भीय पद्धतीने स्वागत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होत असलेल्या या १२० प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या विशेष प्रयत्नातून नियोजन करण्यात आले होते. १० फेब्रुवारी रात्री ८:५० वाजता रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर भाजप नागपूर महानगरचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि नागपूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. नीताताई ठाकरे यांच्या नेतृत्वात हा भव्य स्वागत सोहळा पार पडला.

यावेळी नागपुर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, दक्षिण भारतीय आघाडी,केरला प्रकोष्ठ,आंध्रा प्रकोष्ठ व कार्यकर्त्यांनी दाक्षिणात्य पारंपरिक परिधान परिधान करून आणि पारंपरिक लोकगीतांच्या गजरात केरळच्या पाहुण्यांचे स्वागत केले.या प्रसंगी विदर्भाची ओळख असलेली रसाळ ‘संत्री’ भेट देऊन त्यांचे आदरातिथ्य करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, उत्तर भारतीय पद्धतीचा दुपट्टा आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देऊन या नवनियुक्त प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

.या वेळी “भारत माता की जय” “वंदे मातरम” च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय जी भेंडे,भाजप नागपुर महानगराचे महामंत्री श्रीकांत आगलावे,रितेश गांवडे,विष्णु चांगदे,भाजप सत्ता पक्ष नेता नरेंद्र बोरकर,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे,कार्यालय मंत्री बृजभूषण शुक्ला,मंडळ अध्यक्ष अनिल मानापूरे वंदना शर्मा,राम मुंजे,उदय भास्कर नायर,अमित मुदलियार,विनोद नायडू, टी. ए. जोसेफ, चन्द्रशेखर नागराल, विजय रानी रेड्डी,जगदीशन,वी. उन्नीकृष्णन,श्रीधरन अय्यर,अनिल नायर,सुनील पुल्लाड,योगेश पिल्लई,प्रमिला उन्नीकृष्णन,ललिता अय्यर,सोमा श्रीधरन,जयराज पोतराज,रोशन पिल्ले,पी एस एन मूर्ति,के. सूरीबाबू व मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते,दक्षिण भारतीय आघाडीचे नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.