Published On : Fri, Oct 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा मृत्यू

Advertisement

समृद्धी महामार्गावर मृत्यूचा थरार! देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा मृत्यू

अमरावती : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीचे आगमन होत असतानाच समृद्धी महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारा अपघात झाला. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या पिकअपला धामणगाव रेल्वे परिसरातील चॅनल क्रमांक ९७ जवळ मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की पिकअपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. या दुर्घटनेत तब्बल २५ जण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालय आणि सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावंगी येथे १९ जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. धामणगाव येथे सहा जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अमरावतीचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील आणि धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.