नागपूर: शहरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हनुमान नगर स्थित बबलू गॅस वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका सेल्समनचा पाय कापल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरबत्ती विक्रेता श्री स्वामी सुंगध भांडार येथे दररोज अगरबत्तीची विक्री करायचा. मात्र आज दुकान बंद असल्याने त्यांनी बबलू गॅस वेल्डिंग इलेक्ट्रॉनिक वेल्डिंगच्या दुकानात आपला अगरबत्तीचा माल ठेवला
दुसऱ्या दिवशी तो आपला माल घेण्यासाठी परत आला. याचदरम्यान वेल्डिंगच्या दुकानात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट घडला.
हा स्फोट इतका भीषण होता की यात सेल्समनचा पाय कापून वेगळा झाला. यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी असून त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अजनी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.