Published On : Wed, Jun 10th, 2020

कोरोनाच्या संकटात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे सत्कार

कन्हान : परदेशातून येणाऱ्या कोरोना सारख्या माहामारीने देशातही आपले पाय पसरविले आहे ज्याच्या पासून जिंकण्यासाठी देशातील कोरोना वारीयल म्हणून डॉक्टर, पोलीस , सफाई कर्मचारी काम करीत असून त्यांचे सर्वस्व अभिनंदन करण्यात येत आहे मात्र देशातील वस्तुस्थिती सामान्य जनते पर्यंत वृत्तपत्र , शोसल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवून जनजागृती करणाऱ्या खऱ्या अर्थाने एक वारीयरच म्हणजे पत्रकार, अश्या पत्रकांचा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्कार करून पक्षाचा २१ वा वर्धापन दिन साजरा केला.

ग्रामीण भागातील पत्रकारांना कुठलेही मानधन किव्वा आर्थिक मदद होत नसते तरी ही मीडियाच्या माध्यमातून ते तत्परतेने जनतेची सेवा करतात कोरोना सारख्या संसर्ग रोग पसरणाऱ्या स्थितीत मध्ये अनेक पक्षांनी गोर, गरजू , गरीब मजूर नागरिकांना धान्य वाटप केले , अनेक संघटनेने परराज्यात जाणाऱ्या मजुरांची सोय केली, व अनेक नागरिकांच्या समस्यांची पत्रकारांनी दखल घेत प्रसिद्धीही केली ज्या मुडे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे, अश्या विषम परिस्तिथीत ग्रामीण पत्रकारांनी जीवाचे रान करून गावा कोपऱ्यातील बातम्या पाठविलेल्या अश्या पत्रकारांच्या मानधान व कोरोना पासून लढण्या करिता शासनाने सुरक्ष्याची साहित्य द्यावे, व महाराष्ट्र शासनाने आर्थिक मददची घोषणा केली

त्या मद्ये ग्रामीण भागातील वार्ताहर व पत्रकारांना समाविष्ट करून घ्यावे जेन्हे करून पत्रकारांना प्रोत्साहन मिडेल व जनतेचे प्रश्न जास्त तात्परतेने शासन दरबारी मांडू शकतील या उदेश्याने पत्रकारांना लेखणी व मास किट देऊन सत्कार करण्यात आले प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यभान फरकाडे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, सतीश घारड, एन.एस मालवीय, चंद्रकुमार चौकसे, रमेश गोडघाटे, धनंजय कापसीकर, अनिल जाधव, सुनील सरोदे, दिनेश नांनवटकर, जयंत कुंभलकर, रवी दुपारे, विवेक पाटील, सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.