Published On : Tue, Jul 2nd, 2019

ढोलनाद संघर्ष समिती च्या वतीने नवनियुक्त पी आय संतोष बाकल चा सत्कार

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रणाळा गावातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने रणाळा येथील ढोलनाद संघर्ष समिती च्या वतीने नवनियुक्त पी आय संतोष बाकल यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत सामूहिक चर्चा करीत परिसरात दररोज पोलीस गस्त वाढविण्याचे सांगण्यात आले.

याप्रसंगी सौमित्र नंदी, परितोष मुखर्जी, कोविद तळेकर, हरिष शर्मा, हितेश रामटेके, खैराती खान, संदीप गाजीमवार, शीतल बरबटे, सुमित अमृतकर, गणेश पिल्ले, भारत नानेट, सुभाष पुल्लरवार,जयवंत मानोरे, दीपक धुसिया आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी