Published On : Wed, Jun 26th, 2019

मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सर्वश्री सुरेश धस, कृष्णा गजबे, संजीव रेड्डी, अमल महाडिक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.