Published On : Thu, Feb 21st, 2019

बेघरांनी बघितला आयनॉक्समध्ये ‘गली ब्वॉय’

Advertisement

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयींसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांना इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गली ब्वॉय’ चित्रपट दाखविण्यात आला.

Advertisement

शहरा फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवाऱ्याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. “शहर समृद्धि उत्सव” अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शहरी बेघर निवारातील बेघरांना आयनॉक्स जसवंत तुली मॉल इंदोरा येथे “गल्ली बॉय” हा चित्रपट दाखवण्यात आला.

बेघर असतानाही मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्याचा आनंद अनुभवता आल्याने त्यांच्या उत्साहाचे वातावरण होते. ‘अपना टाईम आएगा’ या चित्रपटातील गाण्याचे फलक झलकावित या बेघरांनी लोकांना ‘आयुष्यात हताश होऊ नका. आनंदाने जगा’ असा मंत्र दिला. याप्रसंगी बेघरांसह दीनदयाल अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे यांचेसह सर्व निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.