जागतिक बेघर निवारा दिन : निवारागृहात मुलभूत सुविधा उपलब्ध
नागपूर : नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला.
जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, नुतन मोरे यांच्या सहकार्याने बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
बेघर व निराधारांना जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाने शहरात पाच ठिकाणी बेघर निवारे सुरू केली आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जागतिक बेघर दिनाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणी बेघर व्यक्तीची शोध मोहीम राबवून त्यांना निवाऱ्यात आणण्यात आले, निवाऱ्याची स्वच्छता व साफसफाई करून निवारा सजविण्यात आला, बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून त्यात नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेघर संवाद अंतर्गत बेघरांचे समुपदेशन करण्यात आले.
दिव्यांग ठेला संचालक की मौके पर मौत #vidarbhanews #nagpur #crimenews #nagpurnews #maharashtra
डॉक्टर मारपीट मामले में आरोपी न्यायिक हिरासत में #maharashtra #updatenews #maharashtranews #news
शिक्षकों की मांग पर छात्रों का धरना
कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन नौटंकी - बावनकुले #NagpurNews #MaharashtraNews #BJP #studentprotest
संजय राउत का सरकार पर तीखा हमला #maharashtranews #delhi #vidarbhannews #nagpurnews #updatenews
प्रेम प्रसंग बना खूनी विवाद! #NagpurNews #Crime #LoveAffair #police #NewsUpdate #attempttomurder





