Published On : Wed, Dec 6th, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त मा. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव व्दारा विनम्र अभिवादन

Advertisement


नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण ‍दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मा. कार्यकारी महपौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी आज सकाळी संविधान चौक (‍रिझर्व्ह बँक) स्थित प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

यावेळी विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक किशोर जिचकार, सुनील हिरणवार, नरेंद्र वालदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला मा. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, मा. स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अपर आयुक्त रविंद्र कुंभारे यांनी पुष्पहार अर्पण करुन बुध्द वंदना करुन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


याप्रसंगी नगरसेवक किशोर जिचकार, संजय हिरणवार, मनोज सांगोळे, उपायुक्त रविंद्र देवतळे, अति. उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहा. आयुक्त्‍ (सा.प्र.) महेश धामेचा, विकास अभियंता सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता ‍ (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम)  डी.डी. जांभुळकर, वैदयकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार,निगम अधीक्षक राजन काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, म.न.पा. कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, राजेश वासनिक, दिलीप तांदळे, नंदू भोवते, भास्कर मेश्राम, रमेश ढवळे, प्रेमदास शेवारे, दिलीप मेश्राम, संजय बागडे, चंद्रमणी रामटेककर, दिपक जांभुळकर, गौतम रंगारी, किशोर चवरे, किशोर मोटघरे, एन.जे. नारनवरे, राकेश चहांदे, पांडुरंग मेश्राम, शिलवान ढोरे, रमेश अडीकने, हिरालाल कोवे, अजय माटे, राजेश लवारे, महतो वंदना धनविजय, रत्नप्रभा आटे, शारदा साखरे, सत्यफुला टेंभूर्णा सह म.न.पा. अधिकारी व कर्मचारी बहुसंख्यने उपस्थित होते.

यानंतर सेंट्रल ऐव्हन्यू रोड स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी नगरसेवक सुनिल हिरणवार, सुभाष घाटे, नानाभाऊ उमाठे, ओमकार राव गुरव, प्रविण बोबडे, केशवराव श्यामकुवर, विलास मेश्राम, सतीश गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.