Published On : Wed, Mar 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात मतदानाच्या पाचही दिवशी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखांना होणार मतदारसंघनिहाय मतदान

Advertisement

नागपूर : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.निवडणुका १९ एप्रिलपासून सुरू होऊन १ जूनपर्यंत चालणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार असून आत्तापर्यंतच्या निकषानुसार त्याच दिवशी निकालही लागेल.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे व 20 मे या मतदानाच्या दिवशी एक दिवसाची पगारी सुट्टी मिळणार आहे.याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात येईल. या निर्णयामुळे शासकीय मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मतदारसंघनिहाय तारीख –

Advertisement

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा- 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा- 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा- 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा- 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.