Published On : Mon, Feb 10th, 2020

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा दुदैवी मृत्यू ही दु:खद बाब- अनिल देशमुख

Advertisement

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याच्यादृष्टीने सरकारची पावले…

मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज दुदैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद बाब आहे. सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Advertisement
Advertisement

नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनी देखील सर्व प्रयत्न केले. मात्र दुदैवाने पीडितेला वाचवण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगी राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहिल असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि मी तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दिशेने उज्ज्वल निकल काम करत आहेत अशीही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement