Published On : Mon, Sep 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

हिंदू समाज हा देशाचा कर्ता-धर्ता;संघप्रमुख मोहन भागवत यांचे अलवरमध्ये विधान

Advertisement

अलवर: हिंदू समाज हा देशाचा कर्ता-धर्ता आहे. त्यामुळे या देशात जे काही घडते त्याचा हिंदू समाजावर परिणाम होतो, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. भागवत राजस्थानमधील अलवर येथे पोहोचले होते, तेथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले मोहन भागवत म्हणाले, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो मूलत: वैश्विक मानवधर्म आहे.

हिंदूंना या मूल्यांचा वारसा त्यांच्या महान पूर्वजांकडून मिळाला आहे. ते शिक्षणाचा उपयोग कोणाचाही अपमान करण्यासाठी नव्हे तर ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतात. तसेच तो पैसा स्वतःसाठी न वापरता धर्मादाय कार्यासाठी वापरतो. जो हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करतो त्याला हिंदू मानले जाते,असे संघ प्रमुख म्हणाले.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तो कोणाची पूजा करतो, तो कोणती भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश काय आहे हे महत्त्वाचे नसते. एकेकाळी लोकांना संघाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आता त्याला व्यापक मान्यता मिळाली आहे. लोक त्याकडे आदराने पाहतात. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण ते त्याचा मनापासून आदर करतात.हिंदू धर्माचे रक्षण करणे ही आपली जबाबदरी असल्याचे ते म्हणाले. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात सध्या कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. सोशल मीडियाचा गैरवापर याला कारणीभूत आहे. त्यामुळे तरुण पिढी पारंपरिक मूल्यांशी अधिकाधिक जोडली जात आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि जेवणासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील. याशिवाय सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण केले जाईल, असेही भागवत म्हणाले.

Advertisement
Advertisement