Advertisement
नागपूर : जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुकनापूर गावाजवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये चालवल्या जाणाऱ्या एका हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर सावनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात ५९ लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला. तसेच २७ जुगारींना अटक करण्यात आली.
या कारवाईत ११ चारचाकी वाहनांसह ५९,१६,१९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर देवलापार पोलीस स्टेशन अधिकारी आणि बीट इन्चार्ज यांच्या बदलीची चर्चा सुरु आहे.