Published On : Fri, Apr 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. गवळी यांनी २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे सुटकेची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली. त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी अरुण गवळी यांना दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

दरम्यान १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे.

Advertisement

याचा आधार घेत गवळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.