नागपूर : नागपूर दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अनेक जामीन अर्जांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
या प्रकरणातील आरोपींचे प्रतिनिधित्व अॅड. आसिफ कुरेशी, अॅड. शिर्रंग भंडारकर, अॅड. रफिक अकबानी, अॅड. अदिल मोहम्मद, अॅड. नविद ओपाई आणि अॅड. अदिल शेख यांनी केलं. त्यांनी आरोपींच्या बाजूने कायदेशीर मुद्दे अत्यंत अचूकपणे मांडले. त्यांनी सादर केलेल्या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाजूंना न्यायालयाकडून मान्यता मिळाली.
न्यायालयाने हा जामीन मंजूर करताना “कोणताही आरोपी दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानला जातो,” या न्यायतत्त्वावर ठाम भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे न्याय केवळ दिलं गेलं आहे असं नव्हे, तर ते झालं आहे हेही समाजासमोर स्पष्टपणे दिसून येत आहे.
ज्यांना जामीन मंजूर झाला आहे, त्यामध्ये खालील आरोपींचा समावेश आहे :
इक्बाल अन्सारी
एजाज अन्सारी
अबसर अन्सारी
इझहार अन्सारी
अशफाकुल्ला अमीनुल्ला
मुजम्मिल अन्सारी
मोहम्मद रहील
मोहम्मद यासिर
हा निर्णय आरोपींसाठी मोठा दिलासा देणारा असून पुढील कायदेशीर प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष राहील.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





