Published On : Thu, Dec 7th, 2017

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा – अनूप कुमार


नागपूर: माजी सैनिकांच्या पुनर्वसनासोबत त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम ध्वजदिन निधी संकलनातून राबविण्यात येत असल्यामुळे प्रत्येकांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात ध्वजदिन सशस्त्रसेना झंडा दिवसानिमित्त ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ विभागीय आयुक्त अनूप कुमार, तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी जनतेला ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त मुख्य संचालक श्रीपाद गजानन सहस्त्रभोजने, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदतीसाठी हा निधी वापरण्यात येत असल्यामुळे जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, 2 कोटी 64 लाख 26 हजार 400 रुपयाचे उद्दिष्ट असून त्यापैकी 89 टक्के निधी गोळा झाला असून राज्यात नागपूर जिल्हा नेहमीच निधी संकलनास अग्रक्रमांकावर असून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


सहस्त्रभोजने यांनी दिले 51 हजाराचा धनादेश

माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त मुख्य संचालक श्रीपाद गजानन सहस्त्रभोजने यांनी सशस्त्र सेना झंडा दिवसानिमित्त माजी सैनिकांच्या कल्याणासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश विभागीय आयुक्त अनूप कुमार यांना दिला. श्रीपाद सहस्त्रभोजने सैनिक कल्याण निधीसाठी नियमितपणे मदत करत असून मागील वर्षी सौ.वसुधा सहस्त्रभोजने यांनी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी ध्वजदिन निधी संकलनाबद्दल माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदींना सशस्त्रसेना झंडा दिवसाचा फ्लॅग लावून ध्वजदिन निधीच्या विनियोगाबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी ध्वजदिन निधी सढळहस्ते मदत केली.


Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement