Published On : Tue, Apr 16th, 2019

नदी स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करा!

Advertisement

आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन : नदी स्वच्छता पूर्वतयारी बैठक

नागपूर: नाग नदी ही नागपूरचे वैभव आहे. मात्र सद्याची नदीची अवस्था पाहता तिच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. शहरातून वाहणा-या नाग नदीसह पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या पुढाकारातून दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविले जाते. मनपाच्या या पुढाकाराला सहकार्य दर्शवित आपली नदी आपली जबाबदारी आहे या भावनेने सर्वांनी नदी स्वच्छता अभियानाला सहकार्य करा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

Advertisement
Advertisement

नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेत शहरातील शासकीय, निम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्त बोलत होते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनीक, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इस्राईल, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता ए.जी. नागदीवे, राजेश भूतकर, अमीन अख्तर, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, वेकोलिचे बी.टी. रामटेके, ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, क्रेडाईचे गौरव अग्रवाल, एसएमएस इन्ड्यूरन्स लिमिटेडचे डॉ. किशोर मालविय, विश्वराज इन्फ्रास्टक्चरचे श्रीकांत समरूतवार, महा मेट्रोचे जयप्रकाश गुप्ता, मो. शफीक, एनएचएआय पीआययूझेड चे स्वप्नील कसार, राजन पाली, डी.पी. वर्मा, एमआयडीसीचे के.टी. बोंद्रे, राहुल तिडके, मंगल कार्यालय असोसिएशनचे संजय काळे, विजय तलमले, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा, कुशाल विज, नागपूर सुधार प्रन्यासचे मनोहर जीवनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जी.डी. जिद्देवार, हल्दीराम समुहाचे दीपक पांडे, यशपाल धीमान उपस्थित होते.

पाच मे ते पाच जून या कालावधीमध्ये शहरातील नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. आपल्या शहरातील वैभव असलेल्या या नद्यांची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे नदी घाण होउ नये यासाठी काळजी घेणेही आपले कर्तव्‍य आहे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होउ नये यासाठी पावसाळ्यापुर्वीच महिनाभरात या तिन्ही नद्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शासकीय, निम शासकीय, स्वयंसेवीसंस्थांसह खासगी संस्थांनी दरवर्षी प्रमाणेच यावेळीही स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी या तिन्ही नद्यांची एकूण ४८ किमी पर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी महिनाभर पोकलेन, जेसीबी, टिप्पर अशा साधनांची अत्यंत गरज भासणार आहे. शहरातील मोठ्या संस्थांनी ही साधने प्रायोजित करण्यासाठी सहकार्य करावे. संस्थांकडून किती साधने प्रायोजित करण्यात येणार आहेत याबाबत योग्य नियोजन करून त्याची माहिती लवकरात लवकर मनपा प्रशासनाला देण्याचेही आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. खासगी संस्थांनीही तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. खासगी संस्थांकडून पुरविण्यात येणा-या साधनांसाठी लाणारे इंधन नागपूर महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी नदी स्वच्छता अभियानात सहभागी होउन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement