नागपूर : शहरात वाढत्या उष्णतेचा परिणाम आता धोकादायक स्वरूपात समोर येऊ लागला आहे. महाल परिसरात आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रचंड उकाड्यामुळे कारने अचानक पेट घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारमधून धूर आणि ज्वाळा निघत असल्याचे पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी वेळीच प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




