Published On : Fri, May 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर उष्णेतेच्या झळांनी तापले ;कमाल तापमान ४१.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले

Advertisement

नागपूर : नागपुरात गुरुवार हा या महिन्यातील सर्वात उष्ण दिवस ठरला असून, शहराचे कमाल तापमान ४१.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस म्हणून 19 एप्रिल ठरला आहे. यादिवशी तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.गुरुवारी विदर्भात अकोला आणि वर्धा सर्वात उष्ण होते, दोन्ही ठिकाणी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस होते. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले.

हवामान अंदाज वेबसाइट एल डोराडोनुसार, जळगाव हे जगातील सातवे सर्वात उष्ण शहर होते, ज्याचे कमाल तापमान ४४.८ अंश सेल्सिअस इतके होते. याशिवाय रात्रीच्या तापमानातही हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी यवतमाळमध्ये सर्वाधिक 27.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या महिन्याच्या सुरूवातीला अनेक ठिकाणी पावसाच्या घटनेसह या प्रदेशात हवामानातील फरक दिसला असताना, पारा पातळी आता वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रादेशिक हवामान केंद्र (RMC), नागपूरच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात नागपूरचे कमाल तापमान ४३-४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. पुढील तीन दिवसांत देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे.

दरम्यान सध्या हवामान विभागाने कोणत्याही जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केलेला नाही. मात्र, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement